MAH SSC Result 2020 LIVE | आज दहावीचा निकाल
MAH SSC Result 2020 LIVE | आज दहावीचा निकाल
राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर (Maharashtra SSC Results 2020) होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल.www.mahresult.nic.in
यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.

Comments
Post a Comment