Posts

Showing posts from August, 2020

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण EWS Economically Weaker Section

Image
   आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण:-  कोणासाठी आहे EWS 10% आरक्षण ? केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी (EWS – Economically Weaker Section) 10% आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण मिळणार आहे. तसेच ह्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वय, परीक्षा फी, व इतर सवलतीचा लाभ मिळेल. काय आहेत EWS 10% आरक्षणासाठी पात्रता निकष (राज्य सरकार) ? अर्जदाराच्या कुटुंबाचे (वडील, आई व 18 वर्षाखालील मुले) यांचे सर्व स्रोतांपासून चे एकत्रित उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.​ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. इतर कुठल्याही प्रवर्गाअंतर्गत ( जसे की SC, ST, OBC, ESBC ) येणाऱ्या लाभार्थ्यांना EWS आरक्षणास पात्र नाहीत EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र. लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड. ...