आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण EWS Economically Weaker Section

   आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण:- 


कोणासाठी आहे EWS 10% आरक्षण ?
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी (EWS – Economically Weaker Section) 10% आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण मिळणार आहे. तसेच ह्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वय, परीक्षा फी, व इतर सवलतीचा लाभ मिळेल.
काय आहेत EWS 10% आरक्षणासाठी पात्रता निकष (राज्य सरकार) ?
अर्जदाराच्या कुटुंबाचे (वडील, आई व 18 वर्षाखालील मुले) यांचे सर्व स्रोतांपासून चे एकत्रित उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.​
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
इतर कुठल्याही प्रवर्गाअंतर्गत ( जसे की SC, ST, OBC, ESBC ) येणाऱ्या लाभार्थ्यांना EWS आरक्षणास पात्र नाहीत
EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र.
लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.
लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.
राशन कार्ड.
रहिवाशी प्रमाणपत्र.
उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8 अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा).
अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
स्वघोषणा पत्र.
विहित नमुन्यातील अर्ज.
3 पासपोर्ट फोटो.
कसे मिळवावे EWS चे प्रमाणपत्र ?
EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित आपले सरकार सेवा केंद्र/ तहसील सेतु मध्ये जमा करून प्रमाणपत्र काढून घ्यावे.. 
___________________________

मुस्लिम समाजाशी निगडित शिक्षण विषयक शासनाची नवीन धोरणे , योजना , स्कॉलरशिप , संस्था , सेमिनार/ वेबिनार , भरती , डिजिटल अभ्यास साहित्य , मुस्लिम समाजातील खरे हीरो इ. बद्दल एकाच ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी "nekraah.blogspot.com" ब्लॉग ला #सब्सक्राइब आणि #शेअर_करा 
लिंक👇
Beautiful Muslim Baby Names click and watch 
https://www.nekraah.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मुग़ल बादशाह जहांगीर Mughal King Jahangir

Muslim Ruler Changej Khan's Grandson Barek khan

Chatrapati Shivaji Maharaj -The Maratha King